सेनगाव: शहरातील जैन मंदिरात भगवान महावीर व श्री अजितनाथ भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना
सेनगाव शहरातील जैन मंदिर या ठिकाणी भगवान महावीर व श्री अजितनाथ भगवान यांच्या 8 फुटी उंच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व भव्य पिच्छीका परिवर्तन सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिकारी व जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेनगाव शहरात पांढऱ्या ग्रेनाईट दगडात भव्य दिव्य बांधकाम सुरू असलेल्या जैन मंदिरात आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी भगवान महावीर व अजितनाथ भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.