नागपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रेम नगर परिसरात एका घराला अचानक लागलेल्या भीषण आगीत एका ५० वर्षीय व्यक्तीचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम नगर येथील रहिवासी जगदीश पालीवाल यांच्या घराला आज अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.