शिरपूर कन्हाळा गावात १७ वर्षीय मुस्लिम मुलाला जळगावातील मोहाडी रोड परिसरात केवळ त्याच्या धार्मिक ओळखीवरून क्रूर मारहाण झाल्याची गंभीर घटना नुकतीच घडली. या अमानवीय घटनेमुळे समाजात तीव्र संताप करत मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता निवेदन सादर केले आहे.