जालना: 1 मे पासून स्वगणनेला होणार सुरुवात’; सर्वांनी त्यात सहभागी होण्याचे जालना जिल्हाधिकारी शिमा मित्तल यांचे आवाहन
Jalna, Jalna | Apr 30, 2026 2027 च्या जनगणनेसाठी नागरिकांना यंदा प्रथमच स्वगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, याची सुरुवात 1 मे पासून होणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना जिल्हाधिकारी शिमा मित्तल यांनी गुरुवार दि. 30 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता केले आहे. स्वगणनेसाठी नागरिकांनी www.se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली व कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरायची आहे. ही प्रक्रिया 1 मे ते 16 मे या कालावधीत सुरू राहणार आहे. जिल्हाधिकार्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.