बदनापूर: नानेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहात रामगिरी महाराजांचे कीर्तन संपन्न ,गावकऱ्यांनी रामगिरी महाराजांची काढली मिरवणूक
Badnapur, Jalna | Oct 30, 2025 आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता बदलापूर तालुक्यातील नानेगाव येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रामगिरी महाराजांचे सुद्धा कीर्तन संपन्न झाले आहे, यावेळी रामगिरीजी महाराज यांचे टाळ मृदंगाच्या गजरात ढोल ताशाच्या गजरात समस्त गावकऱ्यांनी गावभर मिरवणूक काढली होती. याप्रसंगी गावातील सर्व जाती-धर्माचे लोक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.