आज शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडीतील गीताबाग कार्यालयात मुरूड येथील शिवसेनेच्या पदाधिकारी राहिला खान आणि नाईफ कादरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व नवप्रवेशितांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, पक्षनेतृत्वाची कार्ये जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, तसेच पक्ष अधिक बळकट करत निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी रायगड जिल्हा चिटणीस जमीर नाजीर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.