समुद्रपूर: प्रती पंढरी नारायणपूरात विठू नामाचा गजर:हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी:काढण्यात आली भव्य दिंडी शोभायात्रा
प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणपूर येथे दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने गोपाळकृष्ण मंदिरात विठ्ठल भक्ताची दर्शनासाठी गर्दी असते.आज मंदिरात भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठलाचे दर्शन घेतले.यावेळी मंदीर कमिटीच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती.हरीभक्त पारायण दिलीप महाराज रोकडे यांनी काल्याचे किर्तन केले. याठिकाणी निघालेल्या दिंडी सोहळ्यात परीसरातील ५० वर भजन मंडळी सहभागी झाले होते.