समुद्रपूर: गिरड येथील मगन संग्रहालयाकडून देशी बियाणे संवर्धन उपक्रमाअंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांना बिज दानासाठी मार्गदर्शन
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथिल मगन संग्रहालयाच्या वतीने नामशेष होत असलेल्या विविध देशी शाळांचे,फळाचे, भाजीपाल्याच्या बियाण्याचे जतन करून त्यांना नामशेष होण्यापासून रोखण्यासाठी बिज संवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे.देशी बियाण्यासंबधी शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी आता बिज दान अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाअंतर्गत मगन संग्रहालयाचे समन्वयक गजानन गारघाटे, विष्णू ब्राह्मणवाडे यांनी परीसरातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन देशी बियाण्यास संदर्भात मार्गदर्शन केले.