समुद्रपूर: गिरड खुर्सापार रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांना झाले व्यार्घ दर्शन: नागरीकांना पाहताच वाघाच्या पिल्ल्याने काढला पळ
समुद्रपुर तालुक्यातील गिरड व खुर्सापार परीसात गेल्या ८ महिन्यांपासून एका वाघीणीचा तिनं पिल्यासंह व एका वाजाचा मुक्तसंचार सुरू असुन वेळोवेळी नागरीकांच्या या वाघांचे दर्शन होत आहे.शनिवार सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खुर्सापार रस्त्यावर दोन वाघींनीचे पिल्ले खेळताना येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना दिसले काहींनी फोन करून हि माहिती गावात दिली यावेळी या वाघाच्या पिल्ल्याणा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.शेवटी माणसांच्या आवाची भनक लागताच या पिल्याण्यांनी जंगलात पड काढला.