खामगाव: वामन नगर येथील अर्धवट रेल्वे भुयारी मार्ग बुजवून रस्ता मोकळा करुन द्यावा - महेंद्र रोहणकार
वामन नगर येथील अर्धवट रेल्वे भुयारी मार्ग बुजवून रस्ता मोकळा करुन द्यावा - महेंद्र रोहणकार अर्धवट स्थितीत बंद पडलेला वामन नगर येथील रेल्वे भुयारी मार्ग तात्काळ बुजवून परिसरातील नागरिकांना रस्ता पूर्ववत सुरू करून देण्यात यावा, या मागणीसाठी महेंद्र रोहणकारसह नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजे पासून रेल्वे गेट परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे.