पेण: खाकी वर्दीतच पोलिस अधीक्षक आँचल दलाल गरब्याच्या रंगात
Pen, Raigad | Sep 26, 2025 रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीवर लोखंडी मुठ ठेवणाऱ्या आणि डॅशिंग कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी पेण येथील जय अंबिका माता गरबा उत्सवात खाकी वर्दीतच हजेरी लावून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सोबत पेण विभागीय पोलिस उपअधीक्षक आणि पेण पोलिस निरीक्षक देखील उपस्थित होते. कडक शिस्त आणि जबाबदारीचे ओझे पेलणारी ही अधिकारी जेव्हा खाकी वर्दीतील तेजात उत्सवात उतरली, तेव्हा उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.