आज दि 5 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर बिडकीन गावातील फूटवेअर दुकानाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून गावकऱ्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग कशामुळे लागली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.