दिग्रस तालुक्यातील साखरा गावातील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी साखरा येथील प्रभाग क्र. ४ मधील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित अतिक्रमण हटवावे, यासाठी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली. तसेच आंदोलन व उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.