जालना: पेट्रोल-डिझेल टंचाईवर मनसे आक्रमक; “प्रशासन झोपले आहे का?” — राहुल रत्नपारखे यांचा सवाल
Jalna, Jalna | May 23, 2026 जालना शहरासह मराठवाड्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल मिळत नसताना प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे,” असा आरोप त्यांनी केला. रत्नपारखे म्हणाले की, जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. काही ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकरी, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. मात्र याकडे जालन्या