मुदखेड: टाकळी येथे विषारी औषध पिलेल्या 36 वर्षीय तरूण शेतकऱ्याचा सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू
सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड वार्ड क्रं 34 येथे दि 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहाच्या सुमारास यातील मयत वाघजी व्यंकटराव शिंदे वय 36 वर्षे रा.टाकळी ता.मुदखेड.जि.नांदेड यांनी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने बॅंकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत कोणतेतरी विषारी औषध पिऊन उपचार दरम्यान मरण पावले. याप्रकरणी खबर देणार सुरेश शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून आज दुपारी मुदखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असून पुढील तपास सुरू आहे.