वणी: वणी तालुक्यातील मोहोर्ली येथे हताश शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला रोटावेटर
Wani, Yavatmal | Oct 18, 2025 यावर्षी खरीप हंगामापासूनच 'जगाचा पोशिंदा' म्हणून ओळखला जाणारा शेतकरी संकटात सापडला आहे. मे, जुन जुलै, ऑगस्ट २०२५ ते सप्टेंबर या कालावधीत सततच्या झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, उत्पन्न मिळण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. परिणामी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच साजरी होणार आहे.