जालना: मुक्ताई पालखीच्या प्रथम रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण; प्रशासन सज्ज विजय महाराज फुलंब्रीकर
Jalna, Jalna | Jul 3, 2026 संत मुक्ताई पालखी सोहळा जालन्यातून पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार असून, यंदा जालना शहरात प्रथमच रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि जालना महानगरपालिकेकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. रविवारी जे.ई.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात हा रिंगण सोहळा पार पडणार असून, या ठिकाणी उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, जालना महानगरपालिकेचे उपायुक्त कांबळे तसेच महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय महाराज फुलंब्रीकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तयारीची पाहणी केली. यावे