नागपूर शहर: डिप्टी सिग्नल येथे ओव्हर ब्रिजच्या खड्ड्यात पडून दुचाकी स्वाराचा मृत्यू, नागरिकांमध्ये संताप
उपराजधानी सुरू असलेल्या ओव्हरब्रिज कामामुळे एका दुचाकी स्वाराचा दुर्दैवी बळी गेल्याची घटना 16 सप्टेंबर च्या रात्री घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. आणि रोष व्यक्त केला. मृतक युवकाचे नाव महेंद्र फटिंग असे सांगण्यात आले आहे. महेंद्र हा एका स्टील कंपनीत काम करतो. तो कामावरून घरी परत येत असताना ओव्हर ब्रिज च्या कामासाठी रस्त्यावर मोठे खड्डे खोदण्यात आले आहे. काल रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते.