मोहोळ: नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करायला सांगितले आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार
Mohol, Solapur | Sep 24, 2025 सिना नदीला पूर आल्यामुळे मोहोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. दरम्यान, या नुकसानीची आज बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामा करायला सांगितले असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर 65 मिलिमीटर पावसाची अट देखील डोक्यातून काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले.