राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत रायगड जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. योजनेअंतर्गत e-KYC करण्याची अंतिम मुदत राज्य सरकारने वाढवून ३१ डिसेंबर २०२५ केली आहे. अलीकडच्या कालावधीत रायगडसह कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे यात्रा, वाहतूक व कागदपत्रांच्या उपलब्धतेत अडथळे निर्माण झाले होते.