दिग्रस शहरात उघडकीस आलेल्या कोट्यवधींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाशी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, दिग्रस (नोंदणी क्र. ६०२) यांचा कोणताही संबंध नसल्याचा ठाम खुलासा संस्थेने आज दि. ११ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान कन्हैया रेस्टॉरंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. २३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या पतसंस्थेचे २० वर्षे सलग ऑडिट ‘अ’ वर्गात असून संस्थेचे खेळते भांडवल ८५ कोटी आणि १७ कोटींची बँक गुंतवणूक असल्याचे सांगण्यात आले.