महाड: नगर पालिका निवडणुकीसाठी भरत गोगावले यांचा नवीन फॉर्म्युला
ज्याची ताकद जास्त त्याला जास्त जागा
Mahad, Raigad | Nov 9, 2025 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात महायुतीचं सूत जुळताना दिसत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेकडून ठेवलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला सुनील तटकरे यांनी झिडकारला असतानाच आता भरत गोगावले यांनी नगर पालिका निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव ठेवलाय. ज्या नगर पालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्याला जास्त जागा द्यायच्या, ताकद पाहून जागा वाटपाचा हा प्रस्ताव आहे. आता महायुतीमधील घटक पक्ष त्याला कसा प्रतिसाद देतात हे पहावं लागणार आहे.