चिखलदरा: बामादेही दोन गटांत हाणामारी;परस्परांविरुद्ध तक्रारी; आठ जणांसह अनेकांवर गुन्हा दाखल
चिखलदरा तालुक्यातील बामादेही गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या भांडणात दोन्ही बाजूंनी परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या हाणामारीत दोन्ही बाजूचे काही जण जखमी झाले असून पोलिसांनी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी १० वाजता चिखलदरा पोलिसात एकूण दोन गुन्हे नोंदवले आहेत. पहिल्या प्रकरणात फिर्यादी रवि अमरलाल झारखंडे (वय ४२, रा. बामदेही) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,आरोपी राजू परसराम झारखंडे, परसराम तेजीलाल झारखंडे व इतरांनी किरकोळ कारणावरून मारहाण केली.