पवनी तालुक्यातील वलनी चौरास येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाने संपूर्ण परिसरात भक्तीचे चैतन्य पसरवले आहे. सप्ताहाच्या सांगता प्रसंगी आयोजित काल्याच्या कीर्तनाला भाविकांचा जनसागर उसळला होता. या मंगलमयी सोहळ्याला पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. विजया राजेश नंदुरकर ठाकरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यांनी यावेळी श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविकांशी संवाद साधला व उपस्थित जनसमुदायासोबत जमिनीवर बसून अत्यंत साधेपणाने महाप्रसादाचा लाभ घेतला.