अकोला, दि. 15 नोव्हेंबर (सायं. 6 वाजता) : शिक्षक मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2025 अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादी पुनर्निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. प्राप्त अर्जांवरील कार्यवाहीसाठी अधिक वेळ मिळावा म्हणून प्रारूप मतदारयादीची तारीख वाढवून 3 डिसेंबर करण्यात आली आहे. दावे-हरकती 3 ते 18 डिसेंबरदरम्यान स्वीकारले जातील. अंतिम मतदारयादी 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.