महाड: कावळे धनगरवाडी बिबट्याचा धुमाकूळ
दोन गाई फस्त केल्याने शेतकरी हवालदिल!
Mahad, Raigad | Sep 16, 2025 महाड तालुक्यातील कावळे कुंभार्डे धनगरवाडी येथील शेतकऱ्यांच्या दोन पाळीव गाईंवर बिबट्या वाघाने हल्ला करून मृत्युमुखी पाडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून वनविभागकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील कावळे कुंभार्डे धनगर वाडीतील धोंडू कुटेकर या शेतकऱ्याच्या पाळीव दोन गायीवर सलग दोन दिवस हल्ला केल्याने त्या मृत्युमुखी पडल्या आहेत यातील एक गाय बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली जवळील रानामध्ये सापडली तर दुसऱ्या गाईचा अद्याप पत्ता लागत नाही.