अकोला: जीएमसीत निकृष्ट अन्नावर खळबळ — लाडूत झुरळ आढळल्याने चौकशी, सुधारणा आदेश
Akola, Akola | Nov 10, 2025 अकोला : जीएमसी रुग्णालयातील अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीनंतर अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांच्या अध्यक्षतेखाली समितीची तातडीची बैठक दिनांक 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. रुग्णांना पौष्टिक लाडूत झुरळ आढळल्याच्या घटनेची चौकशी सुरू असून संबंधित कर्मचाऱ्यांची विचारपूस झाली आहे. मेस इंचार्जला दर्जा सुधारण्याचे निर्देश देण्यात आले. आरोप सिद्ध झाल्यास कारवाई होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शामकुमार सिरसाम यांनी सांगितले, तर क्रिस्टल कंपनीने आपल्यावरील आरोप नाकारले.ही