अमळनेर शहरातील शहा आलम नगरात विना परवाना नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका तरूणावर अमळनेर पोलीसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १० हजार रूपये किंमतीचा नायलॉनचा मांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.