नागपूर शहर: तमाशा कॅफे येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
एकोणवीस ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामनगर चौकातील तमाशा कॅफे येथे छापा मार कार्यवाही करून हुक्का पॉट व वेगवेगळे तंबाखूजन्य साहित्य असा एकूण 14,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कॅफेमालक हेमंत गुरुबक्षानी व मॅनेजर अमित गोतमारे विरोधात अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच 29 महिला व पुरुष ग्राहकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.