अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सध्या वेगात सुरु असून उमेदवारांच्या नामनिर्देशनाचा टप्पा अंतिम टप्प्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी उद्या मंगळवार, 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी विहित नमुन्यातील नामनिर्देशनपत्रे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निर्धारित वेळेत सादर करणे आवश्यक आहे.