आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत चना खरेदीकरिता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत दिग्रस येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. दिग्रस सह तालुक्यातील चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दि. 27 मार्च पासुन 25 एप्रिल पर्यंत करण्यात येणार असून प्रत्यक्षात चना खरेदी दि. 1 एप्रिल ते 29 जुन पर्यंत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांने ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन मार्केटिंग अधिकारी माळवे यांनी केले.