येवला: विसापूर ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण
Yevla, Nashik | Oct 15, 2025 येवला तालुक्यातील विसापूर येथील ग्रामस्थ सर्जेराव सखाराम भड यांनी विसापूर ग्रामपंचायतीवर घरकुल घोटाळा, अतिक्रमण तसेच भ्रष्टाचाराचा आरोप करत ग्रामपंचायत विरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तरी शासनाला वेळोवेळी सांगून देखील दखल न घेतल्याने ग्रामस्थ सांगत असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा सर्जेराव भड यांनी घेतला आहे.