गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींनी आता आपला मोर्चा बेलगावकडे वळविला आहे. रानटी हत्तींचा कळप बेलगाव आणि रोगी गाव परिसरात दुपारच्या वेळेस दिसून आला आहे. वडधा परिसरात रानटी हत्तींनी धान पिकाचा मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आता हा कळप बेलगाव परिसरात दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण निर्माण झाला आहे. गाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या धान पिकाची कापणी केली आहे तसेच धान पिकाचे पुंजणे तयार करून शेतकऱ्यांनी शेतात ठेवले आहेत.