अकोला: ३० सप्टेंबरपर्यंत पाणीपट्टी न भरल्यास नळजोडणी करण्यात येणार खंडित मनपा पाणीपुरवठा विभागाचा ईशारा
Akola, Akola | Sep 17, 2025 शहरातील पाणीपट्टी थकबाकीदारांवर अकोला महापालिकेने कठोर कारवाईची तयारी केली आहे. येत्या ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास संबंधितांची नळजोडणी खंडित करण्यात येईल, असा इशारा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. थकबाकीवर शास्ती आकारली जाणार असून, देयकातील त्रुटी दुरुस्तीसाठी शहरात शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. मनपाने नागरिकांना त्वरित पाणीपट्टी भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कारवाई टाळण