दर्यापूर: वीस वर्षांपासून जमिनी वाहणाऱ्या भूमिहीनांना न्याय द्या;कान्होली येथील शेतकऱ्यांचा प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा
दर्यापूर तालुक्यातील कान्होली येथील १० ते ११ भूमिहीन कुटुंबे वीस वर्षांपासून ई-क्लास शेत गट क्रमांक २० व २४ मधील जमीन वाहत असूनही त्यांच्या नावे अद्याप सातबारा करण्यात आलेला नाही.दादासाहेब भुसे योजनेअंतर्गत जमीन मिळाल्याचा दावा असतानाही शासनाने दुर्लक्ष केले आहे.संतोष वानखडे,दादाराव वानखडे,रंजना वानखडे,वासुदेव पारीसे,गजानन पारीसे,माणिक चव्हाण यांच्यासह सर्व भूमिहीन शेतकऱ्यांनी शासनाकडे वारंवार निवेदने दिली. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला.