सन 2027 पर्यंत कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान सर्वेक्षणात जिल्ह्यातील 12 हजार 262 संशयीताची तपासणकी करण्यात आली असून तपासणीत 188 नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले.