पालघर: नायगाव येथे जमीन प्रकरणात लाखोंची फसवणूक दोघांविरोधात गुन्हा दाखल
नायगाव येथे एक जमीन खरेदीच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ठाकूरप्रसाद यादव यांना जमीन विक्रीच्या नावाने आरोपी रणजीत किणी रामचंद्र यादव या दोघांनी बनावट दस्तावेज दाखवून त्यांच्याकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून साठे कराराची कागदपत्रे तयार करून 15 लाख रुपये रोख व चेकने रक्कम घेतली. मात्र पैसे घेऊनही जमीन न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आरोपी रंजीत किणी, रामचंद्र यादव यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.