सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारे रील्स बनवून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तरुणांना जळगाव पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. शाहूनगर परिसरात राहणाऱ्या इमरान भिस्ती या तरुणावर पोलिसांनी गुरूवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता तात्काळ प्रतिबंधकात्मक कारवाई करत त्याला त्याची जागा दाखवून दिली.