नागपूर शहर: मानकापूर उडानपूल बनला ब्लॅक स्पॉट, आणखी एका अपघातात युवकाचा मृत्यू
मानकापूर उडाणपूल ब्लॅक स्पॉट बनला आहे. इथे अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन दिवसाआधी स्कूल बस स्कूल यांच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला तर आता कारच्या धडकेत एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. 14 सप्टेंबरला पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास नितेश लांडे हे त्यांच्या डेकोरेशनच्या कामावरून मानकापूर स्टेडियम येथून बोखारा येथे त्यांच्या गोडाऊनकडे दुचाकीने जात असताना पोलीस ठाणे मानकापूर हद्दीतील हरस चौक ते कोराडी कडे जाणाऱ्या उडान पुलावरून जात असताना कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला