सेनगाव: जनप्रहार कामगार संघटनेच्या पुढाकारातून ताकतोडा येथे आरोग्य तपासणी शिबिर,कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या ठिकाणी जनप्रहार बांधकाम कामगार संघटनेच्या पुढाकारातून नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी ताकतोडा येथील कामगारांनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तसेच. जनप्रहार बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष विष्णू मुटकुळे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व डॉक्टर रेखा गांधिले,अविनाश बोना,प्रफुल्ल गायकवाड,गंगासागर खरात,दुर्गादास जाधव,प्रमोद पोले,सोनाली कांबळे संजय कुरवाडे,सुधाकर जाधव यांच्यासह कर्मचारी व बांधकाम कामगार उपस्थित होते.