समुद्रपूर: थकीत भाडे मिळाले नसल्याने घरमालकाने समुद्रपूर तालुका कृषी कार्यालयाला लावले कुलूप: वेधले प्रशासनाचे लक्ष
समुद्रपूर: तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून सुधिर पंजाबराव खडसे यांच्या घरी किरायाणे चालवित आहे.मात्र गेल्या ७ महिन्यापासून किराया मिळाला नसल्याने घरमालक यांनी ९ डिसेंबरपर्यंत थकित असलेले १लाख२० हजार रुपये किराया द्या अन्यथा कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता . यावर कोणतीही तोडगा निघाला नसल्याने सुधिर खडसे यांनी आज सकाळी ८ वाजता कृषी कार्यालयाला कुलूप लावले आहे.नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.यामुळे आता प्रशासन काय कराणार याकडे लक्ष लागले आहे