समुद्रपूर: अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले दुचाकीस्वार ठार:
महामार्गवरील कांनकटी चौकातील घटना
समुद्रपूर:नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कांनकाटी चौकात सकाळी हाटेल मद्धे नास्ता करून दुचाकी ने गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली असून मृतकाचे नाव मंगलसिंग डोमाजी पवार वय ४८ रा कोरी असे आहे मृतक मंगलसिंग हा शेतकरी होता.सकाळी कांनकटी येथील चौकातील हाटेल मध्ये नास्ता करून दुचाकी क्र MH32 R2980 ने कोरी कडे निघाला असता त्याचे दुचाकी ला अज्ञात वाहनाने धडक दिली.