4 डिसेंबरला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार,मंगळवारी उड्डाणपुलावर एका भरधाव ट्रकने पायी चालणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, नवादा (बिहार) येथील रहिवासी असलेला लालू राजवंशी वय २६ वर्ष हा तरुण पायी मंगलवारी उड्डाणपुलावरून जात असताना हा अपघात झाला.याप्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपी राकेश चव्हाण याला अटक करत ट्रक क्रमांक एम एच 31 सी क्यू 90 98 जप्त केला आहे. हा ट्रक सिमेंटच्या पाइपने लोडेड होता