जळगाव: छत्रपती शिवाजी नगरात मूलभूत सुविधांचा अभाव; नागरिकांचा महापालिका प्रशासनाविरोधात रोष
जळगाव शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरातील मारवाडी गल्ली आणि दाल फड भागातील नागरिक अनेक वर्षांपासून रस्ते, गटारी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त आहेत. अनेक वर्षांपासून या भागात नागरिक वास्तव्यास असूनही, महानगरपालिकेने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता केला आहे.