हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निलगगन सोसायटी येथे अखेर चोरट्यांनी डाव साधत सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. 29 सप्टेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नील गगन सोसायटी येथे राहणाऱ्या सौ पूनम आकरे या बाहेर गावी गेल्या असत्या अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून नगदी आणि सोन्याचे दागिने असा एकूण 69 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.