दिग्रस: बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षण लागू करण्यासाठी उद्या विराट मोर्चा: गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चव्हाण
महाराष्ट्र शासनाने नुकतेच मराठा समाज बांधवांना हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर बंजारा समाज बांधवांना देखील हैदराबाद गॅजेटमध्ये उल्लेख असलेल्या एसटी आरक्षण देण्याची मागणी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी केली. ते गोर सेनेच्या दिग्रस येथील विश्रामगृह येथे दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडलेल्या बैठकीत बोलत होते. संपूर्ण बंजारा समाज बांधवांची 'बंजारा आरक्षण समिती' या बॅनरखाली सदर मागणी राज्यभरात करण्यात येणार आहे.