पालघर: सुरुची समुद्रकिनारी वसई विरार महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम; 35 टन कचरा करण्यात आला गोळा
वसई विरार शहर महानगरपालिका मेकिंग द डिफरन्स चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या सहकार्याने सुरुची समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता निमित्त या मोहिमेचे आयोजन करण्यात आले या मोहिमेत 5000 पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला. सुरुची समुद्रकिनारी दोन किलोमीटरच्या परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 35 टन कचरा गोळा करण्यात आला.