समुद्रपूर: गिरड येथील महेश्वरी गिरडे यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
समुद्रपूर : तालुक्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या गिरड येथील महेश्वरी गिरडे हिने सामाजिक कार्य, महिला विकास, ग्रामीण विकास, वक्तृत्व आणि सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार २०२५ साठी निवड झाल्याची माहिती प्राप्त झाली असून हा प्रतिष्ठित पुरस्कार साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदान केला जातो.