वाशिम: तालुक्यातील आसोला येथ पावसामुळं सोयाबीन पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी #Jansamasya
Washim, Washim | Sep 21, 2025 पावसामुळं सोयाबीन पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सोयाबीनचं पिकं हातचं गेल्यात जमा आहे. अजूनही पाऊस सुरूच असल्यानं पुढच्या रब्बी हंगामाची तयारी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे त्यामुळं जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय