ठाणे: सानपाडा येथे मनसेचा नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात बोंबा मारा मोर्चा
Thane, Thane | Oct 16, 2025 सानपाडा विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्या आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सततच्या दुर्लक्षामुळे मनसेने आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 च्या महापालिका मुख्यालयावर बोंबा मारा मोर्चा काढला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत बोंबा मारल्या व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.